रुग्णालये अद्ययावत ठेवा ; कोरोनाची तिसरी लाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Hospital
रुग्णालये अद्ययावत ठेवा ; कोरोनाची तिसरी लाट

कोरोनाची तिसरी लाट; रुग्णालये अद्ययावत ठेवा

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील (third wave of corona)रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली असताना केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र लिहून (Letter)आगामी काळात रुग्णसंख्या किती वेगाने वाढेल याचा अंदाज नसल्याने रुग्णालयांतील सुविधा अद्ययावत ठेवाव्यात, अशी सूचना केली. दरम्यान, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनीही आज राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हर्च्युअल बैठक घेतली. राज्यांनी कोणत्या पद्धतीने ‘मायक्रो मॅनेजमेंट'१ कडे लक्ष ठेवावे याच्याही सूचना दिल्या.

हेही वाचा: लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यानी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असली तरी रूग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण ५ ते १० टक्के इतकेच आहे. मात्र ही परिस्थिती वेगाने बदलू शकते. दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांपैकी २० ते २३ टक्के रुग्णांना रूग्णालयांत दाखल करण्याची वेळ आली होती. ते प्रमाण सध्या ५ ते १० टक्के आहे, तरीही परिस्थिती आगामी काळात बदलू शकते आणि रूग्णालयात य़ेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे सावध राहावे लागणार आहे. सक्रिय रुग्णांची एकूण संख्या, भरती होणाऱ्यांचे प्रमाण, गृह विलीगीकरणात राहणाऱ्यांची संख्या व त्यातील बदल रुग्णालयांतील ऑक्सिजनचा पुरवठा, ऑक्सिजन बेड्ची संख्या यावर दररोज लक्ष ठेवून केंद्रीय यंत्रणेला दररोज ही माहिती राज्यांनी कळवावी. राज्यांना केंद्राकडून काही वाढीव मदत लागत असल्यास त्वरित कळवावे असेही पत्रात कळविले आहे.

हेही वाचा: ठेवीची रक्कम परत न केल्याने पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

दरम्यान, दिल्लीतही कोरोना कहर प्रचंड वाढला असून ८ महिन्यांनंतर आज प्रथमच २२ हजारांवर नवीन रूग्ण आढळले. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन गटाच्या बैठकीत लॉकडाउन सरसकट न लावता निर्बंध कडक करण्याचा निर्णय झाला.

राजनाथसिंह यांना कोरोना

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतःच ही माहिती देताना, गृह विलीगीकरणात आहोत व गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचण्या कराव्यात, असे आवाहन केले आहे.

दिल्लीच्या हजार पोलिसांना लागण

दिल्ली पोलिस दलावरही कोरोना कहर वाढला असून तब्बल १००० पोलिस अधिकारी-कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने पोलिस दल धास्तावले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top