केजरीवालजी, ईव्हीएममुळे आम्ही दिल्ली जिंकलो नाहीत : अमित शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये दोष असल्याने "आप'च्या पराभव झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ईव्हीएममुळे दिल्ली जिंकलो नसल्याचे सांगितले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये दोष असल्याने "आप'च्या पराभव झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ईव्हीएममुळे दिल्ली जिंकलो नसल्याचे सांगितले आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नवनियुक्त नगरसेवकांना शहा आज (मंगळवार) संबोधित करत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "दिल्लीतील जनादेश हा देशाचा जनादेश आहे. यामुळे पुन्हा एकदा देशाचे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे दिसून आले आहे. केजरीवालजींनी आमच्या विजयाचे श्रेय ईव्हीएमला देऊ नये. त्यांना खरे कारण जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आमच्या मतदान केंद्र प्रमुखाची भेट घ्यावी.'

राजधानी दिल्लीतील तीन महानगरपालिकांमधील एकूण 272 जागांपैकी तब्बल 181 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर आम आदमी पक्षाला केवळ 47 जागांवर समाधान मानावे लागले आहे. केजरीवाल यांनी सुरुवातीला ईव्हीएमला दोष दिला. मात्र त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांना भेटल्यानंतर चूक झाल्याचे मान्य केले आहे. आत्मपरीक्षण करून चुका सुधारू, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

Web Title: 'Kejriwal Ji, EVMs Didn't Win Us Delhi,' Amit Shah Mocks AAP