esakal | दिल्लीचा कारभार रामराज्याच्या प्रेरणेनं - अरविंद केजरीवाल
sakal

बोलून बातमी शोधा

DELHI CM ARVIND KEJARIWAL

केजरीवाल यांनी म्हटलं की, आम्ही जनतेच्या सेवेसाठी रामराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेतली आहे. यातूनच दहा सिद्धांतांचे पालन आम्ही करत आहे असं त्यांनी सांगितलं.

दिल्लीचा कारभार रामराज्याच्या प्रेरणेनं - अरविंद केजरीवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये मोठं वक्तव्य केलं. केजरीवाल यांनी म्हटलं की, आम्ही जनतेच्या सेवेसाठी रामराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेतली आहे. यातूनच दहा सिद्धांतांचे पालन आम्ही करत आहे असं त्यांनी सांगितलं. नायब राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना ते म्हणाले की, मी प्रभू रामचंद्रांचा आणि हनुमानाचा भक्त आहे. अयोध्येत राम मंदिर बनल्यानंतर सर्व वृद्धांना मंदिराचे दर्शन घडवू असंही त्यांनी म्हटलं.

दिल्लीतील आप सरकारच्या काकाजाबद्दल सांगताना केजरीवाल म्हणाले की, प्रभु रामचंद्र आपल्या सर्वांचे दैवत आहेत. ते आयोध्येचे राजे होते तेव्हा त्यांच्या राज्यात सर्व काही ठीक होतं. प्रत्येकजण सुखी होता आणि जनतेला अनेक सोयीसुविधा दिल्यानं राज्याला रामराज्य म्हटलं गेलं. ते देव होते आणि त्यांच्याशी तुलना करू शकत नाही. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रयत्न करू तर जीवन धन्य होईल. 

हे वाचा - मुलींना जिन्स, स्कर्ट घालण्यास मनाई; नियम मोडणाऱ्यास होणार शिक्षा

केजरीवालांनी सांगितलेले 10 सिद्धांत 
1) दिल्लीत कोणीही उपाशी झोपणार नाही - यासाठी वेगवेगळ्या योजनांवर सरकार काम करत आहे. 
2) प्रत्येक मुल मग ते गरीबाचं अअसलं तरी त्याला चांगलं शिक्षण मिळायला हवं. एकसारखं शिक्षण घेण्याची संधी प्रत्येकाला आम्ही देत आहोत.
3) कोणी आजारी असेल मग तो श्रीमंत असो किंवा गरीब त्याला योग्य उपचार मिळायला हवेत यासाठी आम्ही सरकारी रुग्णालयांमधील सुविधा वाढवल्या. 
4) कोणी कितीही गरीब असलं तरी त्यांच्या घरी अंधार नसावा - 200 युनिट वीज आम्ही माफ केली. दिल्ली जगातील एकमेव असं राज्य आहे जिथं 200 युनिट वीज सर्वांना मोफत देते. 
5) गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना पाणी मिळायला हवं. 

पाहा Video: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बनले 'कॅप्टन'; टेरिटोरियल आर्मीत मंत्र्याला पहिल्यांदाच मिळालं पद

6) प्रत्येकाला रोजगार असायला हवा. आम्ही सर्वतोपरी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.
7) घर - प्रत्येकाच्या डोक्यावर छत असायला हवं. आमची इच्छा आहे की जे लोक झोपडीत राहतात त्यांना घर मिळायला हवं.
8) महिलांची सुरक्षा - पोलिस आमच्याकडे नाहीत मात्र त्यावर रडगाण्याचा काही उपयोग नाही. ज्यांचं ते काम आहे त्यांनी करावं. आमचं काम होतं सीसीटीव्ही लावणं, बसमध्ये मोफत प्रवास हे आम्ही दिलं आहे. 
9) वृद्धांचा सन्मान - वृद्धांच्या आयुष्यातील हा शेवटचा टप्पा असतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलं आहे की, शेवटच्या काळात व्यक्तीने देवाची भक्ती केली पाहिजे. आयोध्येत राम मंदिर बनल्यानंतर सर्व वृद्धांना मंदिराचे दर्शन घडवणार.
10) कोणी कोणत्याही धर्माचा, जातीचा असला तरीही आम आदमी पार्टीमध्ये सर्व सारखेच आहेत. प्रभू रामचंद्रांनी उष्टी बोरं खाल्ली होती. त्यांच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. आमचा हाच प्रयत्न आहे की, सर्वांनी 

loading image
go to top