esakal | Keral: केरळमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस

केरळमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कलपेट्टा, (केरळ) : केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष पी.व्ही.बालचंद्रन यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

बालचंद्रन ५२ वर्षे काँग्रेसमध्ये होते. केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी समितीचेही ते सदस्य होते. देशात भाजपचा वाढता विस्तार लक्षात घेण्यात काँग्रेसला अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, की काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेनुसार काम करू शकत नाही, हे लक्षात आल्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ बहुसंख्यांकच नव्हे तर अल्पसंख्यांकही काँग्रेस सोडत आहेत. ते दिशा गमावलेल्या पक्षाबरोबर राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, त्यांनी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

वायनाडमध्ये राजीनामासत्र सुरूच

वायनाडमध्ये काँग्रेसमधील राजीनामासत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे माजी आमदार के.सी.रोसाकुट्टी, जिल्हा सरचिटणीस एम.एस.विश्वनाथन आदींनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर बालचंद्रन यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

loading image
go to top