esakal | Assembly Election: निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, NDA च्या तीन उमेदवारांचे नामांकन रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

bjp_20flags_201.jpg

या विधानसभा मतदारसंघात भाजपने अण्णा द्रमूकला पाठिंबा दिलेला आहे. 

Assembly Election: निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, NDA च्या तीन उमेदवारांचे नामांकन रद्द

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली- Kerala Assembly Election 2021 केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या तीन उमेदवारांचे नामांकन रद्द झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थालास्सेरी विधानसभा मतदारसंघ, गुरुवायूर आणि देवीकुलम मतदारसंघातील एनडीएच्या उमेदवाराचे नामांकन रद्द करण्यात आले आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, थालास्सेरी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि पक्षाचे कन्नूरचे अध्यक्ष एन हरिदास यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. हरिदास यांनी सादर केलेल्या अर्जावर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे हस्ताक्षर नसल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. 

तर गुरुवायर मतदारसंघातील भाजप उमदवार आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष निवेदिता सुब्रमण्यम यांचा अर्ज ही याच कारणामुळे फेटाळला आहे. त्याचबरोबर इडुक्कीतील देवीकुलममध्ये अण्णा द्रमुकच्या उमेदवार धनलक्ष्मी यांनी त्यांचा अर्ज पूर्ण आणि व्यवस्थित भरला नसल्याकारणाने रद्द करण्यात आला आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजपने अण्णा द्रमूकला पाठिंबा दिलेला आहे. 

हेही वाचा- Exclusive : लेटरबॉम्ब प्रकरणी चौकशी करण्यास मी पात्र नाही; रिबेरोंचा नकार

दरम्यान, भाजपच्या दोन उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणी उत्तर मागितले आहे. न्या. एन नागरेश यांनी निवडणूक आयोगाला सोमवारी आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. सोमवारी दुपारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. 

केरळचे समीकरण
एकूण जागा : 140 
बहुमतासाठी आवश्यक संख्या : 71
एकूण मतदार : 2,66,40,800 

केरळ : 140 जागा
टप्पे: 01
मतदान: 6 एप्रिल
2016 : एलडीएफने 77 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. 

 

हेही वाचा- जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण; कोरोनाचा कहर सुरूच​

loading image