esakal | हा विजय जनतेला समर्पित : पी. विजयन

बोलून बातमी शोधा

P Vijayan

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि नेत्यांनी केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता. पण त्यांना निवडणुकीच्या निकालातून जनतेने योग्य तो इशारा दिला आहे.

हा विजय जनतेला समर्पित : पी. विजयन
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Kerala Assembly Election Results 2021 : तिरुवनंतपुरम : हा विजय मी केरळच्या जनतेला नम्रपणे समर्पित करतो. त्यांनी एलडीएफच्या बाजूने निकाल दिला आहे. पण ही वेळ आनंदोत्सव साजरा करण्याची नाही. कारण केरळमध्ये सध्या कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, त्यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही सुरू ठेवण्याची ही वेळ आहे, असे मुख्यमंत्री पिनराइ विजयन यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री विजयन पुढे म्हणाले, 'यंदा भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केरळमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि नेत्यांनी केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता. पण त्यांना निवडणुकीच्या निकालातून जनतेने योग्य तो इशारा दिला आहे.'

हेही वाचा: Live : केरळच्या आरोग्यमंत्री, आसाममधील भाजप मंत्र्यांचा दणदणीत विजय

केरळच्या आरोग्यमंत्री विजयी

केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी मत्तनूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. केरळच्या जनतेने एलडीएफला या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आणि त्याबद्दल आम्ही केरळच्या जनतेचे आभारी आहोत.

केरळमधील ४१ जागांचे निकाल हाती

केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्किस्ट) १९, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ४, काँग्रेस ३, इंडियन युनियन मुस्लिम लीग ५, जनता दल (से.) २, केरळ काँग्रेस ३ केरळ काँग्रेस (जॅकोब), इंडियन नॅशनल लीग, जेकेसी, इंडिपेडन्ट आणि रिव्हॉल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ इंडियाने प्रत्येकी १ जागेवर विजय मिळवला आहे.

हेही वाचा: चीनचा निर्लजपणा ; भारतात जळणाऱ्या चितेची मांडली थट्टा

केरळमध्ये एलडीएफला कौल

केरळमध्ये एलडीएफ सर्वाधिक ८५ जागांसह आघाडीवर आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन हे धर्मादाममधून आघाडीवर आहेत. काँग्रेस ४९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपला फक्त ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. मेट्रोमॅन ई श्रीधरन हे पलक्कडमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे.