esakal | केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत; भाजप आमदाराने प्रस्तावाला दिला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

bjp o rajgopal

केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. सभागृहातील सर्वांच्या मताशी मी सहमत आहे. ही लोकशाहीची भावना असल्याचंही त्यांनी सांगितले.

केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत; भाजप आमदाराने प्रस्तावाला दिला पाठिंबा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तिरुवनंतपुरम - केरळच्या विधानसभेत केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला केरळमधील एकमेव भाजप आमदार ओ राजगोपाल यांनीही पाठिंबा दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे प्रस्तावाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं. या प्रस्तावामध्ये कृषी कायदे रद्द करण्यात यावा असं स्पष्ट म्हटलेलं असूनही त्यांना पाठिंबा दिला आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. केरळच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात गुरुवारी मुख्यमंत्री पिनराइ विजयन यांनी प्रस्ताव सादर केला. यामध्ये सत्तारुढ एलडीएफ, विरोधी आघाडी युडीएफ आणि भाजपने याला मंजुरी दिली. 

हे वाचा - 2018-19 च्या तुलनेत यंदा दहशतवादाचा बिमोड करण्यात लक्षणीय यश; घुसखोरीच्या घटनाही घटल्या

अधिवेशनानंतर राजगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, प्रस्ताव सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला आहे. मी माझे मत याबाबतीत मांडले आहे. जिथं माझे विचार वेगळे होते ते मी सदनात सांगतले आहेत. तसंच प्रस्ताव पूर्णपणे मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

केंद्राने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी या प्रस्तावामध्ये करण्यात आली आहे असं जेव्हा राजगोपाल यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, याची कल्पना आहे आणि तरीही प्रस्ताव मान्य असल्याचं त्यांना स्पष्ट केलं. राजगोपाल म्हणाले की, मी प्रस्तावाला पाठिंबा दिला असून केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. सभागृहातील सर्वांच्या मताशी मी सहमत आहे. ही लोकशाहीची भावना असल्याचंही त्यांनी सांगितले. 

हे वाचा - FASTags टोलसंदर्भात मोठा निर्णय; 100 टक्के ऑनलाइन कलेक्शनला दिली मुदत वाढ

राजगोपाल यांना विचारण्यात आलं की, ते पक्षाच्या विरोधात जात आहेत तर त्यांनी सांगितलं की, ही लोकशाही आहे आणि आपल्याला सर्वांच्या मतानुसार चालण्याची गरज आहे. विशेश अधिवेशनावेळी सभागृहात राजगोपाल यांनी चर्चेवेळी म्हटलं होतं की, नवीन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून दलालांपासून वाचवणारा आहे. 

loading image