Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

Kerala new ministers list: काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारतील. दशकभरानंतर संयुक्त लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर आली आहे.
Kerala Cabinet

Kerala Cabinet

ESakal

Updated on

केरळचे भावी मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी रविवारी त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी आपल्या मंत्र्यांची नावे जाहीर केली. हे सर्व मंत्री मुख्यमंत्री सतीशन यांच्यासोबत शपथ घेतील. नवीन मंत्रिमंडळात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असेल. ज्यांची नावे जाहीर झाली आहेत. त्यांमध्ये रमेश चेन्नीथला, के. मुरलीधरन आणि केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख सनी जोसेफ यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com