राज्यातून गरिबी संपली, एकही माणूस सापडणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली घोषणा

Kerala : राज्यातून गरिबी संपलीय, राज्यात एकही गरीब माणूस सापडणार नाही असं म्हणत केरळ राज्यातलं गरीबी संपुष्टात आणणारं पहिलं राज्य बनल्याचा दावा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केलाय.
Kerala CM Pinarayi Vijayan Declares State Free of Poverty Says Not a Single Poor Person Left

Kerala CM Pinarayi Vijayan Declares State Free of Poverty Says Not a Single Poor Person Left

Esakal

Updated on

साक्षरतेबाबत केरळ राज्य नेहमीच चर्चेत असतं. आता सध्या राज्यात गरीबी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींची चर्चा देशात होत आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी राज्याच्या विधानसभेत केरळमध्ये गरीबी संपुष्टात आणल्याची घोषणा केली. एलडीएफ सरकारने दावा केला की, गरीबी संपुष्टात आलेलं केरळ देशातलं पहिलं राज्य आहे. राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घोषणा केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com