केरळमधील महाविद्यालयात सरस्वती पुजेला नाकारली परवानगी

केरळमधील महाविद्यालयात सरस्वती पुजेला नाकारली परवानगी

नवी दिल्ली : केरळच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सरस्वती पूजा करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. सर्वधर्मीय परंपरा मानणारी आपली संस्था आहे, असे कारण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.

केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात कोचीन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात ही परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाचे रजिस्ट्रारने सांगितले, की कुलगुरुंनी सरस्वती पूजा करण्यास परवानगी नाकारली आहे. आमची संस्था सर्वधर्मीय परंपरा मानणारी आहे. त्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक बाबींना महाविद्यालयाच्या आवारात परवानगी देऊ शकत नाही. 

दरम्यान, यापूर्वी गोमांसच्या मुद्यावरून महाविद्यालयात हाणामारी झाली होती. त्यानंतर आता सरस्वती पुजेला परवानगी नाकारण्यात आल्याने हे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com