

केरळमधील एका न्यायालयाने तरुणीला प्रियकराच्या हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलीय. नेय्याट्टिनकरा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तरुणाच्या हत्या प्रकरणी तरुणीसह तिच्या काकालाही दोषी ठरवलंय. निर्मलकुमार नायर असं काकाचं नाव आहे. त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. तर तरुणीच्या आईची निर्दोष सुटका करण्यात आलीय.