Sanjay Roy: आरजी कर मेडिकल कॉलेज डॉक्टर अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेप! मृताच्या कुटुंबीयांना भरपाई द्या; कोर्टाचे सरकारला आदेश

Accused Sanjay Roy Life Imprisonment: आरजी कर मेडिकल कॉलेज डॉक्टर अत्याचार प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Accused Sanjay Roy Life Imprisonment
Accused Sanjay Roy Life ImprisonmentESakal
Updated on

आरजी कर मेडिकल कॉलेज डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला आरजी कार मेडिकलमध्ये एका 31 वर्षीय कर्तव्यदक्ष डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने आरजी कर बलात्कार-हत्येप्रकरणी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर न्यायालयाने 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी रॉयला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com