esakal | बकरी ईदनिमित्त निर्बंधात सूट; SC ने केरळ सरकारला फटकारले
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court

बकरी ईद निमित्त सूट देण्याचा प्रकार हा धक्कादायक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

बकरी ईदनिमित्त निर्बंधात सूट; SC ने केरळ सरकारला फटकारले

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कावड यात्रा रद्द करण्यात आली. दोन्ही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असतानाही त्यांनी कावड यात्रा रद्द केली. तर दुसरीकडे केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी झाली नसताना बकरी इदच्या निमित्ताने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला फटकारले. परिस्थिती कठीण असतानाही निर्बंधात सूट देणं हे भीतीदायक आहे.

बकरी ईद निमित्त सूट देण्याचा प्रकार हा धक्कादायक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्य सरकारने दबावाखाली येऊन सूट दिली आहे. तसंच केरळ सरकारने दिलेलं प्रतिज्ञापत्र हे चिंता वाढवणारं असल्याचंही सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे.

हेही वाचा: अदानी ग्रुपने मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला केलं स्थलांतरित

केरळमधील कोरोनाची स्थिती ही चिंताजनक आहे. मात्र केरळ सरकारने दबावाखाली येऊन सूट देण्याचा निर्णय घेतला. केरळ सरकार सर्वोच्च न्यायालयाने कावड यात्रेसाठी दिलेल्या आदेशाचेच पालन करावे. लोकांच्या जगण्याच्या मौलिक अधिकाराचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होता कामा नये. सूट दिल्यानं काही दुर्दैवी घटना घडली आणि लोकांकडून याबाबत तक्रार आल्यास पुन्हा कारवाई केली जाईल असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला.

loading image