केरळ सरकारनं केली एक वर्षाची तयारी, वाचा नागरिकांसाठीचे नियम!

Kerala_CM_P_Vijayan
Kerala_CM_P_Vijayan

तिरुवनंतपूरम : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी आता केरळ राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन सरकारने कोरोनापासून बचाव करण्यासाठी पुढील एक वर्षाची तयारी केली आहे. या एक वर्षात नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. 

पुढील एक वर्षासाठी हे नियम लागू राहतील. सार्वजनिक ठिकाणी जाताना सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) आणि मास्क वापरणे बंधनकारक असेल. असे पाऊल उचलणारे केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असून सहा फूट इतके सोशल डिस्टन्सिंगचे अंतर राखणे, लग्न कार्यात जास्तीत जास्त ५० लोक तसेच अंत्यसंस्काराच्या विधीसाठी फक्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक सभा, मोर्चा, धरणे आंदोलन करता येणार नाही. तसेच या कार्यक्रमांसाठी परवानगी मिळाल्यानंतरही त्यामध्ये जास्तीत जास्त १० लोकांना सहभागी होता येणार आहे. यांसारखे नियम सरकारने बनविले आहेत. 

दरम्यान, कोरोना व्हायरसचा देशातील पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात केरळमध्येच आढळून आला होता. सध्या केरळमध्ये ५२०० हून अधिकजण कोरोनाने संक्रमित आढळून आले आहेत. सध्या कोरोनाच्या २१२९ पॉझिटिव्ह केसेस असून ३०४८ लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत केरळमधील २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशभरात २४,८५० नव्या केसेस पुढे आल्या आहेत. यामुळे कोरोना संक्रमितांचा आकडा ६,७३,१६५ वर पोहोचला आहे. तसेच ६१३ जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याने एकूण मृतांची संख्या १९२६८ एवढी झाली आहे. दुसरीकडे कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. आतापर्यंत ४,०९,०८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com