लसीकरण सर्टिफिकेटवरील मोदींच्या फोटोविरोधात हाय कोर्टात याचिका; केंद्राला मागीतलंं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kerala High Court

लसीकरण सर्टिफिकेटवरील मोदींच्या फोटोविरोधात हाय कोर्टात याचिका

कोची : कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकण्याच्या याचिकेवर (Nagendra mode picture on vaccine certificate) केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारकडे उत्तर मागितले. न्यायमूर्ती एन नागरेश यांनी एका ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या याचिकेवर केंद्र आणि केरळ सरकारला नोटीस बजावली असून त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तरे मागवली आहेत. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो असणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्याला पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी प्रति-प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: ''NCB ने माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं'', माजी ACP चा आरोप

याचिकाकर्ते पीटर मायालीपरंपिल यांनी दावा केला आहे की, त्यांनी लसीच्या दोन डोससाठी पैसे दिले होते. त्यामुळे प्रमाणपत्र ही त्यांचा खाजगी स्पेस असून यावर त्यांची वैयक्तिक माहिती आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेवर हस्तक्षेप करणे अयोग्य आहे.

हेही वाचा: तुमचा पासवर्ड हॅक झालाय? 'गुगल क्रोम पासवर्ड चेकर' वापरुन लगेच तपासा

loading image
go to top