''NCB ने माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं'', माजी ACP चा आरोप|Drugs Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

''NCB ने माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं'', माजी ACP चा आरोप

मुंबई : आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. तसेच उच्च न्यायालयाने देखील एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता मुंबईतील निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर आरोप केले आहेत. माझ्या मुलाला खोट्या ड्रग्स प्रकरणात (Drugs) अटक केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा: ''पुरावा दिला तर बक्षीस देईन'', मलिकांनी शेअर केला क्रांतीच्या चॅटचा स्क्रीनशॉट

माजी सहाय्यक पोलिस आयुक्त अनंत केंजळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ''त्यांचा मुलगा श्रेयस केंजळे याला जूनमध्ये कथित ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण, त्यावेळी घटनेच्या पंचनामा करताना स्वतः समीर वानखेडे उपस्थित होते. पण, पंचनाम्यामध्ये त्यांची नोंद करण्यात आली नाही. अटकेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यामध्ये समीर वानखेडे मुख्य प्रवेशद्वारातून आता आल्याचे दिसतेय. रात्री १० वाजून ५० मिनिटांनी इमारतीच्या बाहेर पडताना दिसतात. पण, त्याची नोंद पंचनाम्यामध्ये घेतली जात नाही. पंचनामा आणि सीसीटीव्ही फुटेज हे संशयास्पद आहेत. त्यामुळे न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज ग्राह्य धरावे'', अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

श्रेयस केंजळेला जून महिन्यात रात्री ८ वाजता एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक केली होती. त्याच्याकडे ३०० ग्रॅम गांजा सापडल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. तसेच ''जप्त केलेला गांजा सीलपॅक करून नेल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. पण, एनसीबीची टीम श्रेयस केंजळेसह इमारतीमधून निघताना बॅगला सील नसल्याचे दिसतेय'', असेही केंजळे म्हणतात.

''केंजळे यांनी त्यांच्या निवासस्थानाचा पंचनामा अनेकवेळा एनसीबीकडे मागितला. मात्र, एनसीबीने तो दिला नाही. त्यामुळे त्यांनी मेला केला. त्यानंतर काही वेळातच त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि सांगितले की मेल पाठवायला नको होता. आता एनसीबीचे अधिकारी त्याच्यावर मोठा खटला चालवतील'', असा दावा देखील केंजळे यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी एनसीबी या आठवड्याच्या अखेरीस उत्तर दाखल करणार आहे.

loading image
go to top