तुमचा पासवर्ड हॅक झालाय? 'गुगल क्रोम पासवर्ड चेकर' वापरुन लगेच तपासा | Chrome Password Checker | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Chrome Password Checker

तुमचा पासवर्ड हॅक झालाय? 'गुगल क्रोम पासवर्ड चेकर' वापरुन लगेच तपासा

सध्या जगभरातील बरेच व्यवहार हे ऑनलाईन केले जात आहेत, त्यामुळे सायबर सुरक्षा हा सध्या महत्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे तुपचे पासवर्ड सुरक्षित ठेवणे एक वेगळी जवाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडली आहे. दरम्यान तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड्स हॅक झाले आहेत का हे कसे ओळखावे किंवा तुमचा पासवर्ड सुरक्षित कसा ठेवायचा याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बहुसंख्य लोक त्यांच्या Google, Facebook, Twitter, किंवा इतर पासवर्ड हॅक झाले आहेत का याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. आज आपण या समस्येवर एक उपाय जाणून घेणार आहोत.

तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि Google, Facebook, Twitter, बँक खाती आणि इतर सोशल मीडिया अकाऊंट्सचे तुमचे पासवर्ड हॅक झाल्यास तुम्हाला अलर्ट करण्यासाठी Google ने त्याच्या Chrome ब्राउझरमध्ये सेक्युरिटी मध्ये आणखी एक लेयर जोडली आहे. हे Google Chrome Password Checker एक्स्टेंशन तुमचे सर्व सेव्ह केलेले आणि सिंक केलेले पासवर्ड सुरक्षित आहेत का याबद्दल तुम्हाला माहिती देईल.

हे बिल्ट-इन Chrome पासवर्ड टूल तुमचे सर्व सेव्ह केलेले आणि सिंक केलेले पासवर्डसह हॅक झाल्यास अलर्ट करेल, त्यासोबतच तुम्ही सेव्ह केलेला पासवर्ड किसी स्ट्रॉंग आहे हे देखील तपासते.

हेही वाचा: कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

तुमचे पासवर्ड हॅक झालेत का ते कसे तपासाल?

  • Google Chrome Password Checker टूल वापरण्यासाठी, पहिल्यांदा तुम्हाला Chrome ब्राउझर अपग्रेड करणे आवश्यक आहे. तुमचा वेब ब्राउझर Chrome 96 किंवा त्या नंतरच्या आवृत्तीवर अपडेट केलेले असावे.

  • नंतर तुमचे Google Chrome ब्राउझर उघडा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन-डॉट मेनूमधून 'Settings' ऑप्शन निवडा.

  • ड्रॉप-डाउन मेनूमधून 'Autofill' हा ऑप्शन निवडा, त्यानंतर 'Passwords.' या ऑप्शनवर क्लिक करा.

  • त्यानंतर सेव्ह केलेले पासवर्ड निवडा.

  • या पुर्वी तुम्ही सेव्ह केलेले सर्व पासवर्ड आपोआप तपासले जातील आणि ते हॅक झाले आहेत का किंवा कमकुवत आहेत का यावर आधारित गटांमध्ये त्यांचे वर्गीकरण करेल. तुमच्या पासवर्ड हॅक झाले असल्यास हे टूल तुम्हाला शक्य तितक्या लवकर ते रीसेट करण्याचा सल्ला देईल.

हेही वाचा: मतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता, वाचा सोपी प्रोसेस

तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग कसा बनवाल?

तुमचा पासवर्ड हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक खात्याचा पासवर्ड यूनिक बनवा जसे की Gmail, Facebook, Twitter, ऑनलाइन बँकिंग आणि इतर सेवांसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. एकच पासवर्ड सगळीकडे वापरणे धोकादायक ठरू शकते. कमीत कमी 12 कॅरेक्टर असलेला पासवर्ड हा अधिक सुरक्षित असतो.

पासवर्ड म्हणून तुमचे कोणतेही आवडते गीत, तुमच्यासाठी खास असतील असे शब्द किंवा आवडत्या पुस्तकातील एखादे कोट हे सर्व बेस्ट पर्याय असू शकतात. मोठ्या पासवर्डमध्ये अंक आणि स्पेशल कॅरेक्टर, जसे की हॅशटॅग (#) जोडल्याने तो आणखी सुरक्षित होतो. दरम्यान पासवर्डमध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती आणि सामान्य शब्द जसे की तुमचे टोपणनाव, कुटुंबातील सदस्याचा पत्ता किंवा सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली इतर माहिती वापरणे टाळा.

loading image
go to top