
लग्नात वधूला घातलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर घटस्फोटानंतर कुणाचा अधिकार? याबाबत केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. लग्नात वधूला भेट म्हणून दिलेलं सोनं आणि रोख रक्कम ही तिची मालमत्ता किंवा स्त्रीधन मानलं जातं असं न्यायालयाने म्हटलं. महिलेच्या पालकांनी सोने खरेदीचे कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर पत्नीला ६० तोळे सोने किंवा सध्याचे बाजारमूल्य परत करण्याचे आदेश दिले आहेत.