

Kerala NH66 Collapses Suddenly, School Bus and Vehicles Trapped
Esakal
केरळमधील कोल्लम जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग एनएच ६६ वर भीषण दुर्घटना घडलीय. कोट्टियम मैलाक्कड जवळ रस्त्याच्या बांधकामावेळी बांधण्यात आलेली रिटेनिंग भिंत अचानक कोसळली. यामुळे रस्ताही खचला असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. या दुर्घटनेमुळे अनेक वाहनं अडकून पडली. यात स्कूलबसचासुद्धा समावेश होता. रस्ता खचल्यानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडीही झाली होती.