आयएएस अधिकाऱ्याच्या कारच्या धडकेने पत्रकाराचा मृत्यू

accident
accident

तिरुअनंतपुरम : केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने दुचाकीवरून चाललेल्या पत्रकाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या केरळ केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्थानिक पत्रकाराचा मृत्यू झाला. के. एम. बशीर (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते एका मल्याळम वर्तमानपत्रात ब्युरो चीफ पदावर कार्यरत होते. तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

केरळमधील 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे श्रीराम वेंकटरामन हे कार चालवत होते. अपघाताच्यावेळी ते दारुच्या नशेत होते. एक महिला प्रवासी त्यांच्या शेजारी बसली होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मध्यरात्री दीडच्या सुमारास कारने बाईकला धडक दिल्यानंतर कार जवळच्या भिंतीवर जाऊन आपटली. बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या श्रीराम यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेत हार्वडमध्ये एक वर्ष शिकून मागच्याच आठवडयात श्रीराम भारतात परतले होते. एक ऑगस्टपासूनच सर्वे आणि लँड रेकॉर्ड विभागात संचालक म्हणून रुजू झाले होते. 2012 च्या बॅचमध्ये ते दुसरे टॉपर होते. इडुक्की जिल्ह्यात देवीकुलममध्ये कार्यरत असताना त्यांनी भू माफियांविरोधात कारवाई केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com