Ambulance : रूग्णवाहिकेचा दरवाजा न उघडल्याने अपघातातील जखमीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

Ambulance : रूग्णवाहिकेचा दरवाजा न उघडल्याने अपघातातील जखमीचा मृत्यू

रस्ते अपघात झाल्यानंतर जखमींना वेळेत रूग्णालायात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेचे अतिशय महत्त्वाचे योगदान असते. वेळेत रूग्णालयात दाखल केल्याने आतापर्यंत लाखो लोकाचे जीव वाचले आहेत. मात्र, रूग्णवाहिकेचा दरवाजा न उघडल्याने रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा रूग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. केरळमध्ये ही घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पोलिसांनी कोयमोन वय 66 अशी केली असून, तो फेरोक येथील रहिवासी आहे. याबाबत लाईव्ह हिंदुस्थानने वृत्त प्रकाशित केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोयेमोन यांना सोमवारी दुपारी कोझिकोड येथे एका स्कूटरने धडक दिली होती. यामध्ये कोयेमोन गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडला नाही. यामुळे कोयेमोन जखमी अवस्थेत सुमारे अर्धा तास रूग्णवाहिकेत होते.

दरवाजा उघडण्यास विलंब झाल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाही आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचा चालक आणि सहाय्यक यांनी वाहनाचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही. अखेर शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी रूग्णवाहिकेची काच फोडून दरवाजा उघडला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

घटनेच्या चौकशीचे आदेश

दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Kerala Injured Person Died Due To Ambulance Door Not Open Health Minister Ordered For Inquiry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..