
केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वडकंथरा येथील एका शाळेच्या कॅम्पसबाहेर बुधवारी धोकादायक स्फोटके जप्त करण्यात आली. पोलिसांच्या एफआयआरमध्ये ही स्फोटके अत्यंत धोकादायक असल्याचे पुष्टी करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी एका विद्यार्थ्याने स्फोटकांपैकी एक उपकरण फेकले. ज्याचा वापर रानडुकरांना मारण्यासाठी केला जात असल्याचा संशय होता. त्यामुळे स्फोट झाला. यात विद्यार्थी आणि जवळच असलेल्या एका वृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली.