मोठी बातमी : विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; अपघाताचे कारण होणार स्पष्ट!

Kerala Plane Crash, Black Boxes Recovered
Kerala Plane Crash, Black Boxes Recovered

नवी दिल्ली : केरळमध्ये एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन घसरुन झालेल्या अपघातात दोन वैमानिकांसह 17 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये जवळपास 130 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की धावपट्टीवरुन घसरल्यानंतर दरीत कोसळलेल्या विमानाचे दोन तुकडे झाले होते. 191 प्रवासी असलेलेल विमान अतिवृष्टी असल्यामुळे धावपट्टीहून घसरले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत. विमानामध्ये काही तांत्रिक खराबी होती का? यासंदर्भातील माहिती ब्लॅक बॉक्समुळे मिळू शकेल.  

ब्लॅक बॉक्सला 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर' म्हणून ओळखले जाते. हे  विमानातील एक असे उपकरण आहे ज्यामध्ये  उड्डानावेळीच्या सर्व गोष्टी रेकॉर्ड होत असतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विमानात मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स हे उपकरण असते.   टायटेनियम धातूपासून तयार करण्यात आलेला असतो. विमान ऊंचीवरुन कोसळले तरी  ब्लॅक बॉक्सचे नुकसान होऊ नये यासाठी एका  टायटेनियमच्या बॉक्समध्येच हा ब्लॅक बॉक्स  ठेवलेला असतो. 1953-54 मध्ये विमान अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.  विमान दुर्घटना नेमकी कशामुळे झाली आणि त्या रोखण्यासाठी काय करावे लागले, याची माहिती रेकॉर्डेड डेटाच्या माध्यमातून मिळणे सोपे आहे. 

ब्लॅक बॉक्समध्ये दोन वेगवेगळे बॉक्स असतात 

1. फ्लायट डेटा रेकॉर्डर:
- याच्या माध्यमातून विमानाची दिशा, विमान किती उंचीवर आहे, इंधन, गती, केबिनमधील तापमान आणि विमानाच्या सर्व मुव्हमेंट यासारखी जवळपास  88 प्रकारची माहिती 25 तासांहून अधिक काळ जतन करुन ठेवली जाते.  हे बॉक्स लाल किंवा गुलाबी रंगात असतात जेणेकरुन अपघातानंतर ते शोधणे सहज सोपे होईल.  
2. कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर: - या उपकरणाद्वारे अखेरच्या दोन तासांतील ऑडिओ स्वरुपातील रेकॉर्डिंग उपलब्ध असते. त्यामुळे दुर्घटनेपूर्वी विमानाची स्थिती काय होती याचा अंदाज बांधणे सहज शक्य होते.  

हे वाचा - केरळ विमान दुर्घटना : पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 14 जणांचा मृत्यू

ब्लॅक बॉक्स नेमते काम कसे करतो?

मजबूत धातूपासून तयार करण्यात आलेले हे उपकरण 30 दिवसांहून अधिक काळ वीजेशिवाय कार्यरत राहू शकते. 11,000 डिग्री सेल्सियस तापमान झेलण्याती क्षमता यात असते. एखाद्या ठिकाणी पडल्यानंतर  30 दिवस प्रत्येक सेकंदाला यातून बीपचा आवाज येतो. आवाजाची तीव्रता ही 2-3 किमी पर्यंत ऐकू जाईल इतकी असते. त्यामुळे विमान अपघाताची माहिती मिळवण्यासाठी हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com