केरळमध्ये तरुणाची हत्या; पोलीस स्टेशनमध्येच आणला मृतदेह

murder
murdersakal media
Updated on: 

केरळ : येथील कोट्टायम जिल्ह्यात (Kottayam district) सोमवारी धक्कादायक घटना घडलीय. एका १९ वर्षीय तरुणाची हत्या (Murder crime) करुन त्याचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्येच आणल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शान बाबू असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका गुंडाला अटक (goon arrested) केली असून के टी जोमॉन असं त्याचं नाव आहे. आरोपीनं तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर टाकला. त्यानंतर त्याने तरुणाची हत्या केली असल्याचा दावा केला. आरोपीने पोलीस स्टेशनमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी त्याला पकडून तुरुंगात डांबले. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Kerala police arrested goon kt jomon in young boy murder crime)

murder
ठाणे : 43 गुंतवणूकदारांची फसवणूक; कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बिल्डरला अटक

कोटायमचे पोलीस अधिक्षक डी शिल्पा यांनी दिलेली माहिती अशी की, "शान हा एका गँगचा प्रतिस्पर्धी होता. मला मारून तो त्याच्या प्रदेशात वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्नात होता. मला शानची हत्या करायची नव्हती तर त्याच्यावर फक्त हल्ला करण्याचा माझा उद्देश होता." असं आरोपी जोमॉनने पोलिसांना सांगितलं.

"शान रविवारपासून बेपत्ता झाला होता. शानच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. कोटायम रुग्णालयात पोलिसांनी शानला उपचारासाठी दाखल केलं होतं पण त्याचा मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. दोन गँगमध्ये ड्रग्जच्या तस्करीवरुन वादविवाद झाल्याने ही हत्या झाली असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आलीय. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Thousands of Police Deployed and Monitored via Drones in Connaught Place Central Park Area; Police Ban on March
Breaking Marathi News live Updates
"High-alert over 'Lehra Do Tiranga' march in Delhi; Intense debate in political circles."
CJP Tiranga March :
Marathi News Esakal
www.esakal.com