मुला-मुलींना एकसारखाच गणवेश! 'जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म' आणणारी देशातील पहिलीच शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुला-मुलींना एकसारखाच गणवेश! 'जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म' आणणारी देशातील पहिलीच शाळा

मुला-मुलींना एकसारखाच गणवेश! 'जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म' आणणारी देशातील पहिलीच शाळा

नवी दिल्ली : शाळेमध्येच मुलां-मुलींमध्ये लैंगिक समानतेचं तत्त्व लागू केलं गेलं तर पुढे जाऊन समाजात दिसून येणारी लैंगिक असमानता मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. याचसाठीचा एक प्रयत्न केरळ राज्यातील एका शाळेत घडताना दिसून येतोय. केरळमधील एर्नाकूलम जिल्ह्यातील वलयनचिरंगारामधील सरकारी लोअर प्रायमरी शाळेमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी एकसारखाच युनिफॉर्म लागू केला आहे. या माध्यमातून लैंगिक समानतेचं तत्त्व लागू करण्याचा शाळेचा मानस आहे.

हेही वाचा: नोटांचा पाऊस! चित्रपटात नव्हे, हे प्रत्यक्षात घडलंय; लुटणाऱ्यांच्या मागे लागले पोलिस

जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म

शाळेच्या या निर्णयामुळे शाळेचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे. शाळेत शिकणारे सगळेच विद्यार्थी आता जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म परिधान करणार आहेत. 2018 सालीच ही कल्पना तत्कालिन मुख्याध्यापिकांच्या मनात आली होती. त्यांनी ही कल्पना आपल्या वरिष्ठांसमोर मांडली होती. या गणवेशामध्ये विद्यार्थी शर्ट आणि थ्री-फॉर्थ परिधान करतात. या युनिफॉर्ममुळे त्यांना कोणतीही ऍक्टीव्हीटी करताना अडचणीचा सामना करावा लागत नाही. तसेच मुले देखील आनंदात असतात.

90 टक्के पालकांचा पाठिंबा

2018 मध्ये या युनिफॉर्मचा प्रस्ताव मांडणाऱ्या माजी मुख्याध्यापिका सी राजी यांनी म्हटलंय की, ही शाळा चांगला आणि व्यापक दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवते. जेंव्हा आम्ही या पॉलिसीला लागू करण्याचा विचार करत होतो, तेंव्हा आमच्या समोर लैंगिक समानता हाच मुद्दा होता. त्याचवेळी याप्रकारच्या युनिफॉर्मचा विषय आमच्या मनात आला. कारण जेंव्हा मुलींसाठी स्कर्ट ठरवला जातो तेंव्हा मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांना देखील शाळेमध्ये तेवढीच सहजता मिळाली पाहिजे, हा विचार करुन हा निर्णय घेतला गेला तेंव्हा 90 टक्के पालकांनी यास पाठिंबा दिला.

हेही वाचा: तुम्ही PM असाल देशाचे, मी इथला इनचार्ज; युकेच्या सभापतींनी सुनावले

केरळमधील ही शाळा 105 वर्षे म्हणजेच एक शतकाहून जुनी आहे. असं असूनही या शाळेच्या निर्णयांमध्ये कसल्याही प्रकारचा पुराणमतवादीपणा दिसून आला नाही. याऊलट आधुनिक विचारसरणीच दिसून आली. स्कर्टमध्ये मुलींना शाळेमध्ये वेगवेगळ्या ऍक्टीव्हीटी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना खेळताना देखील बऱ्याच अडचणी येतात. याचाच विचार करता हा निर्णय घेण्यात आला. जी सहजता मुलांना प्राप्त होते, तीच मुलींनाही मिळायला हवी, हा लैंगिक समानतेचा विचार डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image
go to top