खाली बसा! तुम्ही पंतप्रधान असाल देशाचे, मी इथला इनचार्ज; युकेच्या सभापतींचा VIDEO VIRAL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही PM असाल देशाचे, मी इथला इनचार्ज; युकेच्या सभापतींनी सुनावले

पंतप्रधानांना सदनाच्या सभापतींनी तुम्ही देशाचे पंतप्रधान असाल पण मी या सदनाचा इनचार्ज आहे अशा शब्दांत सुनावलं.

तुम्ही PM असाल देशाचे, मी इथला इनचार्ज; युकेच्या सभापतींनी सुनावले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आंध्रप्रदेशच्या विधासनभेत नुकतंच चंद्राबाबू नायडू यांना त्यांची बाजू मांडता आली नाही. आपला हा अपमान असल्याच्या भावना व्यक्त करताना पत्रकार परिषदेत नायडू सर्वांसमोर रडलेसुद्धा. तसंच त्यांनी शपथही घेतली की आता मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत जाणार नाही. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत हे घडलं, पण जगात एका पंतप्रधानांना सदनाच्या सभापतींनी तुम्ही देशाचे पंतप्रधान असाल पण मी या सदनाचा इनचार्ज आहे अशा शब्दांत सुनावलं. ही घटना घडली ब्रिटनच्या 'युके हाउस ऑफ कॉमन'मध्ये कामकाज सुरु असताना. या प्रकाराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

युके हाउस ऑफ कॉमन मध्ये प्रश्नोत्तरांचा तास सुरु होता. यावेळी विरोधी पक्ष नेते केर स्टारममर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रश्न केला. यावर उत्तर न देता बोरिस जॉन्सन यांनी प्रतिप्रश्न विचारण्यास सुरुवात केली. बोरिस म्हणाले की, मी क्षमा मागतो, पण सदस्य का सांगत नाहीत की त्यांना माहिती कुठून मिळाली.

बोरिस जॉन्सन हे उत्तर न देताच प्रश्न करत असताना सभापतींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही बोरिस जॉन्सन बोलतच राहिले. तेव्हा सभापती म्हणाले की, खाली बसा, मला आव्हान देता येणार नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान असाल पण मी या सदनाचा इनचार्ज आहे.

हेही वाचा: इंग्लंडच्या राणीचे हात जांभळे? डॉक्टर म्हणाले...

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना खाली बसण्यास सांगून सभापतींनी पुन्हा विरोधी पक्षाला बोलण्याची संधी दिली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी संसदेत झालेल्या या प्रकाराची चर्चा सर्वत्र होत आहे. एका देशाच्या पंतप्रधानांना अशा पद्धतीने शांत बसण्यास सांगितल्यानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

loading image
go to top