VIDEO: नोटांचा पाऊस! चित्रपटात नव्हे, हे प्रत्यक्षात घडलंय; लुटणाऱ्यांच्या मागे पोलिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोटांचा पाऊस! चित्रपटात नव्हे, हे प्रत्यक्षात घडलंय; लुटणाऱ्यांच्या मागे लागले पोलिस

नोटांचा पाऊस! चित्रपटात नव्हे, हे प्रत्यक्षात घडलंय; लुटणाऱ्यांच्या मागे लागले पोलिस

रस्त्यावरुन चालत जाताना जर दहा रुपयांची नोट जरी सापडली तरी आपल्याला मनोमन डोंगराएवढा आनंद होतो. मात्र, दहा रुपयांच्या नोटा सोडा पाचशे-हजारांच्या मोठ्या नोटांचा वर्षावच रस्त्यावर झाला तर तुमची अवस्था काय होईल? आणि यापुढे जाऊन जर असं सांगितलं की, अशीच काहीशी घटना प्रत्यक्षात घडलेली आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? होय ही घटना घडलीय मात्र ती अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये! गेल्या शुक्रवारी अमेरिकेमध्ये डॉलर्सचा पाऊस पडला आणि लोकांनी रस्त्याच्या मधोमध या नोटांसाठी मोठा गोंधळ माजवला. मात्र, आता या लोकांमागे पोलिसांचा आणि एफबीआयचा ससेमिरा सुरु झाला आहे. या लोकांना सांगण्यात आलंय की, यावेळी गोळा केलेल्या नोटा परत करा अथवा तुमच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा: 'हम निकल पडे...' CM योगींसोबत PM मोदींचा 'दोस्ताना'

कसा पडला नोटांचा पाऊस?

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील कार्ल्सबॅडच्या इंटरस्टेट हायवे-5 वरुन शुक्रवारी सकाळी जवळपास 9:15 वाजता नोटांनी भरलेला एक ट्रक जात होता. या ट्रकमध्ये नोटांनी भरलेल्या बॅग्स होत्या. मात्र, या ट्रकचा मागील दरवाजा अचानक उघडला गेला आणि जोरदार हवेमुळे बॅग्स उघडून त्यातील नोटा उडू लागल्या. बॅग उघडल्यामुळे हवेमध्ये नोटा उडू लागल्या आणि आसपासचे लोक आपल्या गाड्या थांबवून या नोटा गोळा करुन लुटू लागले. यामुळे संपूर्ण हायवे काही मिनिटांतच जाम झाला.

ड्रायव्हरलाच झाली दमदाटी

ट्रक चालवणाऱ्या ड्रायव्हरला जेंव्हा ही गोष्ट लक्षात आली तेंव्हा त्याने लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोटांच्या पावसामुळे लोक इतके वेडे झाले होते की, त्यांना त्याचं ऐकायची शुद्धच नव्हती. या साऱ्या घटनाक्रमात अनेक लोकांनी ड्रायव्हरसोबत धक्काबुक्की देखील केली. सरतेशेवटी, ड्रायव्हरला पोलिसांना माहिती द्यावी लागली.

हेही वाचा: विनोद तावडेंचं पुनर्वसन, राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

पोलिसांनी सील केला रस्ता

पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी उपस्थित लोकांना इशारा दिला की त्यांनी या नोटा परत कराव्यात. मात्र, लोक या नोटांच्या पावसामुळे इतके हरकले होते की त्यांना या इशाऱ्याने देखील काहीच फरक पडला नाही. यानंतर पोलिसांनी दोन्हीही बाजूने रस्ता सील केला. त्यानंतर काही लोकांनी आपल्याकडच्या नोटा परत केल्या. मात्र, अनेक लोक आपापल्या गाड्यांमध्ये नोटा टाकून फरार झाले होते. आता या प्रकरणी एफबीआय तपास करत आहे. नोटा परत न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

loading image
go to top