केरळच्या पर्यटन फेसबुकला मिळाले 15 लाख लाइक्‍स 

पीटीआय
शुक्रवार, 18 मे 2018

फेसबुकने नुकताच देशातील राजकीय संस्था, मंत्रालये आणि राजकीय पक्षांच्या फेसबुक पेजविषयीचा डाटा प्रसिद्ध केला आहे. केरळ पर्यटनाचे संचालक पी. बाला किरण यांनी नवी दिल्लीतील फेसबुक कार्यालयात सोशल मीडिया साइटच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजर नितीन सलूजा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 
 
तिरुअनंतपूरम - केरळच्या पर्यटन विभागाच्या फेसबुकला गेल्या वर्षी देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात लाइक्‍स मिळाले आहेत. या फेसबुक पेजला गेल्या वर्षी 15 लाख लाइक्‍स मिळाली आहेत. या संदर्भात आज काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की देवाच्या या देशात मोहक असे बॅकवॉटर, सुंदर समुद्र किनारे आहेत. जम्मू-काश्‍मीर आणि गुजरात पर्यटन विभागाच्या फेसबुकने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला आहे. एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत या टुरिस्ट पेजला मिळालेले लाइक्‍स, प्रतिक्रिया, शेअर्स याच्याआधारे त्याची रॅंक ठरविली आहे. त्यात केरळ टुरिझमच्या फेसबुकला 15 लाख लाइक्‍स मिळाल्या होत्या, असे या पत्रकात म्हटले आहे. 

फेसबुकने नुकताच देशातील राजकीय संस्था, मंत्रालये आणि राजकीय पक्षांच्या फेसबुक पेजविषयीचा डाटा प्रसिद्ध केला आहे. केरळ पर्यटनाचे संचालक पी. बाला किरण यांनी नवी दिल्लीतील फेसबुक कार्यालयात सोशल मीडिया साइटच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजर नितीन सलूजा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 
 
Web Title: Kerala Tourism Facebook page got 1.5 million likes