फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

Kerala Girl died after chewing arali flower: २४ वर्षीय तरुणी फोनवर आपल्या घरच्यांशी बोलण्यात इतकी मग्न झाली की, बागेत फिरत असताना तिने एक विषारी फूल कधी तोडून खाल्लं ते तिला कळलंही नाही.
Kerala Girl died after chewing arali flower
Kerala Girl died after chewing arali floweresakal

Kerala Girl died after chewing arali flower

आपण बघितलं असेल अनेक लोक फोनमध्ये एवढे गुंतले असतात की त्यांना आजूबाजूला काय सुरु आहे. हे देखील माहित नसते. काही लोक फोनवर बोलताना अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना जाण्याची गरज नसते. अशी एक घटना केरळमध्ये घडली आहे. घरच्यांशी बोलताना एक मुलगी एवढी मग्न झाली होती की बागेत फिरताना तिने विषारी फूल खाल्लं अन् तिला कळलं देखील नाही. या मुलीचा यात मृत्यू झाला.

एखादं फुल खाल्लं तर मृत्यू कसा होऊ शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र मुलीने चुकून ओलिंडरचे फूल चघळले होते, यालाच आर्ली म्हणतात हे अतिशय विषारी फूल आहे. अलप्पुझा जिल्ह्यातील २४ वर्षीय सूर्या सुरेंद्रन हीला यूकेमध्ये नर्सची नोकरी मिळाली होती. तिथे जाण्यासाठी ती रविवारी कोची विमानतळावर पोहोचली. मात्र अचानक ती बेशुद्ध पडली.

यानंतर सूर्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने डॉक्टर आणि कुटुंबीयांना सांगितले होते की, रविवारी विमानतळावर येण्यापूर्वी ती नातेवाईक आणि मित्रांशी फोनवर बोलत होती. यावेळी त्यांनी चुकून अरली फूल चघळले. पण ते लक्षात येताच त्याने लगेच थुंकले. मात्र तोपर्यंत फुलातील विषारी घटक मुलीच्या पोटात गेला होता. शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे कारण अरली फूल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Trending News in Marathi)

Kerala Girl died after chewing arali flower
"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

त्यांच्या मुलीच्या पोटात फुलाचा कोणताही भाग आढळला नसून रक्तात काही विषारी पदार्थ असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. 

Kerala Girl died after chewing arali flower
Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com