UP : 15 ऑगस्टनंतर भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; दलित-ब्राह्मण नेत्यांची नावं चर्चेत

दलित आणि ब्राह्मण समाजातील एक-दोन नावंही या शर्यतीत आहेत.
UP BJP State President
UP BJP State President esakal
Summary

दलित आणि ब्राह्मण समाजातील एक-दोन नावंही या शर्यतीत आहेत.

UP BJP State President : भाजपात (BJP) प्रदेश सरचिटणीस (संघटन) म्हणून धरमपाल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, आता लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाचीही घोषणा होणार आहे. पक्षाचा देशव्यापी कार्यक्रम तिरंगा यात्रेनंतर म्हणजेच, 15 ऑगस्टनंतर हे नाव कधीही समोर येऊ शकतं.

नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची सर्वाधिक चर्चा मागास जातीतील नेते आहेत. यानंतर दलित आणि ब्राह्मण (Brahmin) समाजातील एक-दोन नावंही या शर्यतीत आहेत. मात्र, यापूर्वीच्या अनेक निर्णयांप्रमाणंच यावेळी प्रदेशाध्यक्ष निवडीतही भाजप आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकतं, असं जाणकारांचं मत आहे. असं काही नाव येण्याची शक्यता आहे, ज्याची कुठंही चर्चा झालेली नाहीय. दरम्यान, या निवडीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी दिल्लीत बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमुळं नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. 15 ऑगस्टनंतर घोषणा होणार असल्याचं बोललं जातंय.

UP BJP State President
Bacchu Kadu : राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो; बच्चू कडूंचा कोणाला इशारा

नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावरही मुख्यमंत्र्यांची संमती घेतली जाणार आहे. अटकळांमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. प्रदेशाध्यक्ष होताच 2017 मध्ये भाजप पूर्ण बहुमतानं वर्षांनंतर राज्यात सत्तेवर आला. त्यांच्या कार्यशैलीमुळं आणि संघटनेप्रती समर्पित भावनेमुळं ते सर्वमान्य नेते आहेत, असा पक्षाचा विश्वास आहे. त्यामुळं त्यांच्या अनुभवांचा फायदा पक्षाला 2024 मध्ये घ्यायचा आहे. मात्र, विधानपरिषदेतील सभागृहनेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर आता त्यांच्या नावाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

UP BJP State President
Bihar Politics : सत्ता बदलाचा थेट परिणाम राज्यसभेच्या समीकरणावर, हरिवंश राजीनामा देणार?

मागासवर्गीयांमधून केंद्र सरकारमधील मंत्री बीएल वर्मा यांचं नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढं येत आहे. दुसरीकडं, राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री भूपेंद्र चौधरी यांचंही नाव चर्चेत आलं आहे. याशिवाय, माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, ब्राह्मण नेत्यांमध्ये खासदार सुब्रत पाठक यांचंही नाव वेळोवेळी काही लोकांकडून प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर येत आहे. खासदार रमाशंकर कठेरिया आणि विनोद सोनकर यांचीही नावं वेळोवेळी पुढं येत आहेत. याशिवाय, राजकीय प्रकाशझोतात अनेक नावांची चर्चा सुरूय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com