
Amritpal Singh : त्याने विवाहित अविवाहित कोणालाच सोडलं नाही; अनेकींशी अफेअर, व्हिडीओवरुन...
वारीस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अमृतपालने अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेलही केलं आहे. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो धमक्या द्यायचा. अनेक मुलींसोबत त्याने हे कृत्य केलं आहे.
इंडिया टुडे तसंच आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अमृतपाल सिंग जवळ अनेक मुलींच्या ऑडिओ तसंच व्हिडिओ क्लिप्सही आहे. एका क्लिपमध्ये अमृतपाल स्वतः कोणालातरी सांगतोय की कशा पद्धतीने मुलींना त्याच्याशी लग्न करायचं असतं, पण तो कसा त्यांच्यासोबत फक्त टाइमपास करत असतो.
कॅनडातल्या एका मुलीसोबतही आपण रिलेशनशीपमध्ये असल्याचं अमृतपालने सांगितलं. एका ऑडिओ क्लिपमध्ये अमृतपाल सिंग म्हणतो की, मुली रिलेशनशीपमध्ये किती पटकन सिरीयस होतात. मला याच यायचंच नाहीये. माझे आपले छोटे छोटे रिलेशनशीप ठीक आहेत. एक मुलगी माझ्या प्रेमात पडलीय, कॅनडाची नागरिक आहे, मला म्हणतेय माझ्याशी लग्न कर. तिची मैत्रीणही प्रेमात पडलीय.
एका विवाहित महिलेसोबतही आपलं अफेअर असल्याचं अमृतपाल सिंगने सांगितलंय. अमृतपाल सिंगचे इन्स्टाग्राम चॅट्सही व्हायरल होत आहेत. त्यामध्ये तो अनेक मुलींशी चॅटिंग करत असल्याचं दिसत आहे.