'अच्छे दिन कुठे आहेत?'; महागाई दरावरून रुपाली ठोंबरेंचा निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Patil-Thombare

'अच्छे दिन कुठे आहेत?'; महागाई दरावरून रुपाली ठोंबरेंचा निशाणा

पुणे : महागाई दरात वारंवार वाढ होत आहे. एप्रिलमध्ये महागाई दर ७.७९ इतका झाला असून मार्चमधील महागाई दराच्या तुलनेत एप्रिलमध्ये एका टक्क्यानी वाढ झाली आहे. त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे यांनी महागाईवरून अच्छे दिन कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे.

एप्रिमध्ये महागाई दर ६.९५ वरुन ७.७९ वर पोहोचला असून एका महिन्यात १ टक्काने वाढ झाली आहे. दरम्यान एप्रिल २०२१ मध्ये महागाई दर फक्त ४.२३ टक्के इतका होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये महागाई दरात ५.५६ टक्क्यानी वाढ झाली आहे. त्यावर रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करत अच्छे दिन कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंच्या बहिणीचे पुण्यात निधन, संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली

"महागाईवरून २०१४ ला आगीचा डोंब उठवला होता. तीच महागाई आटोक्यात आणणार म्हणून लोकांनी भाजपाला सत्तेत आणले आणि आज महागाई दर ७.७९ इतका झाला." असा टोला त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर लावला आहे.

हेही वाचा: महागाईचा आलेख वाढताच; किरकोळ महागाई दरात एका टक्क्याने वाढ

आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महागाई दराची तुलना केली आहे. ग्रामीण भागात महागाई दर ७.६६ वरून ८.३८ वर पोहोचला आहे तसेच शहरी भागात महागाई दर ६.१२ वरून ७.०९ झाला आहे. तर मग अच्छे दिन कुठे आहेत? कधी येणार अच्छे दिन? असा सवाल करत त्यांनी निशाणा साधला आहे.

Web Title: Rupali Thombare On Retail Inflation In April March Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top