Khan Sir Coaching Centre Firing
esakal
खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खान सर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, गोळीबाराच्या वेळी आपण घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.