

Khan Sir Controversy
Esakal
Khan Sir Controversy: बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर काल रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेला नवा वळण मिळाले आहे. सुरुवातीला गोळीबार झाल्याचा दावा करणारे खान सर यांनी आता आपले विधानवरुन यु-टर्न घेतला आहे. खान सर यांनी मंगळवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, त्यावेळी वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. त्यामुळे नेमके काय घडत आहे, हे त्यांना स्पष्टपणे कळले नाही. त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीवरून प्रथम प्रतिक्रिया दिली होती.