Durga Visarjan Accident : दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना ! ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने ८ मुलींसह ११ जणांचा मृत्यू

Khandwa Accident News, मध्य प्रदेशातील खांडवा येथे दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने ८ मुलींसह एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात २०-२५ लोक जखमी झाले आहेत.
"11 people, including 8 girls, die as tractor-trolley falls into pond during Durga immersion in Khandwa – Rescue operations underway at the scene."

"11 people, including 8 girls, die as tractor-trolley falls into pond during Durga immersion in Khandwa – Rescue operations underway at the scene."

esakal

Updated on

Summary

  1. मृतांमध्ये बहुतेक लहान मुली असल्याचे समोर आले आहे.

  2. ट्रॉली कल्व्हर्टवर थांबली असता तोल जाऊन ती तलावात पडली.

  3. बचाव पथके व प्रशासनाने घटनास्थळी शोधकार्य व मदतकार्य सुरू केले आहे.

मध्य प्रदेशातील खांडवा मध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याने आठ मुलींसह अकरा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत २० ते २५ जण जखमी असल्याची माहिती आहे. बचाव पथके इतरांचा शोध घेत आहेत. पंधना परिसरात दुर्गा विसर्जन समारंभादरम्यान मोठा अपघात झाला. दुर्गा विसर्जन समारंभासाठी लोकांना घेऊन जाणारी ट्रॉली कल्व्हर्टवरून उलटली, ज्यामुळे त्यात बसलेले तलावात पडले. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथके सध्या इतरांचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com