भाजप नेत्याचं वडिलांकडून लैंगिक शोषण; मुलाखतीतून खुलासा: Khushboo Sundar: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khushboo Sundar

Khushboo Sundar: भाजप नेत्याचं वडिलांकडून लैंगिक शोषण; मुलाखतीतून खुलासा

'८ वर्षांची असल्यापासून वडील माझं लैंगिक शोषण करत होते', असा धक्कादायक खुलासा भाजप नेते खुशबू सुंदर यांनी केला आहे. सुंदर या सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीदेखील आहेत.

बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये खुशबू सुंदर बोलत होत्या. खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुलाखतीदरम्यान, सुंदर यांनी बालपणीचा धक्कादायक अनुभव सांगितला.

तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

मी आठ वर्षांची असल्यापासून माझे वडील.....

''मी आठ वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते. जेव्हा मी १५ वर्षांची झाले, तेव्हा माझ्यामध्ये त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत आली. कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून मी आठ वर्षं गप्प राहिले.

मला एका गोष्टीची कायम भीती वाटत राहायची. ‘काहीही झालं तरी माझा पती म्हणजे परमेश्वर आहे’ अशा मानसिकतेची माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. पण जेव्हा मी १५ वर्षांची झाले, मी वडिलांविरोधात बोलायला सुरुवात केली.''

Umesh Pal Case: उमेश पाल हत्याकांड प्रकरणात पहिला गोळी झाडणाऱ्या उस्मानचा एन्काउंटर

माझ्या वडिलांना वाटायचं की पत्नी आणि मुलांना मारहाण करणं हा त्यांचा अधिकार आहे.आपल्या एकुलत्या मुलीचं लैंगिक शोषणही करणं त्यांचा हक्क असल्याचं त्यांना वाटायचं.

तसेच, 'मला वाटतं की जेव्हा एका लहान मुलाचं किंवा मुलीचं लैंगिक शोषण होतं, तेव्हा त्याला आयुष्यभर मानसिक त्रास सहन करावा लागतो.' अशी चिंताही सुंदर यांनी यावेळी व्यक्त केली.

खुशबू सुंदर या दक्षिणेतील एक प्रथितयश अभिनेत्री आहेत. २०१० मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०२० मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. नुकतंच खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली

LIVE Update: कसब्याच्या विजयावर शरद पवार यांना शंका होती? काय म्हणाले पवार

सुंदर यांनी २०२१ मध्ये रजनीकांत यांच्यासोबत 'अन्नात्थे' चित्रपटात भूमिका केली होती. तर नुकतेच त्यांनी सुपरस्टार विजय च्या 'वारिसु' या चित्रपटात कॅमिओ केला. यासोबतच, खुशबू यांनी 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं.