काँग्रेसने खुशबू सुंदर यांना प्रवक्ते पदावरुन हटवले, भाजपत सहभागी होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

खुशबू भाजपमध्ये सहभागी झाल्यास तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदा मिळू शकतो.

नवी दिल्ली- फिल्मी दुनियेतून राजकारणात सक्रिय झालेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर यांना काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हटवले आहे. खुशबू सुंदर या आज भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी त्या दिल्लीला रवानाही झाल्या आहेत. परंतु, विमानतळावर त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी काहीच भाष्य केले नाही. 

खुशबू भाजपमध्ये सहभागी झाल्यास तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदा मिळू शकतो. भाजप त्यांना स्टार प्रचारक म्हणून राज्यात उतरवू शकतात. 

खुशबू या 2014 मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या होत्या. 2018 मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना स्टार प्रचारकाचे स्थान दिले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा धडाक्यात प्रचार केला होता. सत्ताधाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केला होता. 

हेही वाचा- बिहार निवडणूक 2020: भाजपच्या पहिल्या सभेत मोदी, नितीश यांच्या कामाची प्रशंसा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khushbu Sundar dropped as congress spokesperson with immediate effect likely to join BJP