दया न दाखवता मारुन टाका...: मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

बंगळुरु : "हल्लेखोराला कोणतीही दया न दाखवता मारुन टाका, काहीही प्रॉब्लेम नाही.' हे उद्गार आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे. कुमारस्वामी फोनवर बोलत असातानाचा संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओमुळे कुमारस्वामी नव्या वादात सापडले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जेडीएस (जनता दल सेक्युलर) पक्षातील एका नेत्याची सोमवारी (ता. 24) हत्या झाली. कुमारस्वामी या हत्येबाबत फोनवर बोलत असताना म्हणाले, "मारताना कोणत्याही गोष्टीची तमा बाळगू नका." सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी असा कोणताही आदेश दिला नसल्याची प्रतिक्रिया देत कुमारस्वामी सारवासारव केली.

दरम्यान, कर्नाटकमधील जेडीएसचे नेते नेते प्रकाश (50) यांची सोमवारी हत्या करण्यात आली. प्रकाश हे त्यांच्या मोटारीने मद्दूरला जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. चार दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या प्रकाश यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. प्रकाश यांच्या हत्येची माहिती मिळताच कुमारस्वामी भडकले.  ''प्रकाश चांगला माणूस होता. प्रकाशला मारणाऱ्या नराधमांना कोणतीही तमा न बाळगता ठार मारा. काहीही प्रॉब्लेम नाही, असे कुमारस्वामी बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Kill them mercilessly: Karnataka CM Kumaraswamy instruction caught on video