Crime News: विवाहबाह्य संबंध कायम ठेवण्यासाठी चिमुकल्याची हत्या...12 वर्षीय मुलाने पाहिल्याने त्यालाही संपवलं

Bihar Patna Crime News: बिहारची राजधानी पाटनाच्या गोपालपुरा पोलीस स्टेशन भागात ७ मार्च रोजी घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे
Crime News
Crime News

Patna Crime- बिहारची राजधानी पाटनाच्या गोपालपुरा पोलीस स्टेशन भागात ७ मार्च रोजी घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. एसपी भारत सोनी यांनी यासंदर्भातील माहिती देताना सांगितलं की, आरोपी गणेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. त्याने विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून दोन मुलांची हत्या केली आहे.(Killing two children to maintain an extramarital affair bihar patna crime news)

हत्याकांडाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला होता.आरोपी गणेश कुमार याचे लग्न झाले आहे. शिवाय त्याला दोन मुलं देखील आहेत. आरोपी ऑटो चालवण्याशिवाय इतर देखील छोटेमोठे काम करतो.

आरोपी एका महिलेच्या घरी राहू लागला होता. याच दरम्यान व्यक्तीचे महिलेशी प्रेमसंबंध सुरु झाली. महिलेला या प्रेमसंबंधातून एक मुलगा देखील झाला आहे. त्यानंतरही दोघांमध्ये प्रेमसंबध सुरु होते, अशी माहिती एसपी भारत सोनी यांनी दिली.

Crime News
Pune Crime : जीवे मारण्याच्या उद्देशाने, दुचाकीस मोटारीची धडक; पुणे- पानशेत रस्त्यावर नांदेड गावाच्या हद्दीतील घटना

आरोपीची महिलेशी लग्न करण्याची इच्छा होती. महिलेवर तो लग्नासाठी दबाव टाकत होता. महिलेचा याला विरोध होता. याच रागातून आरोपीने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने ३ वर्षाच्या मुलाची धारधार शस्त्राने हत्या केली आहे. आरोपीने चिमुकल्याचा मृतदेह शेतामध्ये मातीत पुरला. चिमुकल्याची हत्या करताना १२ वर्षाच्या मुलाने पाहिले होते. त्यामुळे त्याने दोन्ही मुलांची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला होता.

दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी सक्रियपणे तपास सुरु केला होता. अखेर आरोपी गणेश कुमार याला अटक करण्यात आली. याप्रकरणी सध्या पोलिसांना कोणतेही शस्त्र सापडले नाही. पोलीस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपीने सांगितलं की, त्याची दुसऱ्या मुलाची हत्या करण्याची कोणतीही इच्छा नव्हती. पण, त्याने हत्या करताना पाहिल्याने त्यालाही संपवलं.

Crime News
Crime News: मोबाईवरून झालल्या भांडणात महिलेचा मृत्यू; पोलिसांनी घेतले दिराला ताब्यात

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या बदायुमध्ये एका व्यक्तीने दोन लहान मुलांची हत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com