धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सरकारचा मोठा निर्णय! माजी IPS अधिकाऱ्याकडे मोठी जबाबदारी, शिक्षण क्षेत्रात बजावणार महत्त्वाची भूमिका!

Kiran Bedi Appointed as National Mentor by NCTE : माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची राष्ट्रीय शिक्षक मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Former IPS officer Dr. Kiran Bedi has been appointed as a National Mentor by the National Council for Teacher Education (NCTE) under the Ministry of Education's MITRA initiative

Former IPS officer Dr. Kiran Bedi has been appointed as a National Mentor by the National Council for Teacher Education (NCTE) under the Ministry of Education's MITRA initiative

esakal

Updated on: 

What Is the MITRA Initiative of the Education Ministry?

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आणि पुडुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्यावर केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) त्यांची राष्ट्रीय मार्गदर्शक (नॅशनल मेंटॉर) म्हणून निवड केली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘मित्रा’ (मेंटॉरिंग इनिशिएटिव्ह फॉर टीचिंग, रिसर्च अँड असेसमेंट) या उपक्रमांतर्गत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वीही किरण बेदी यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Loading content, please wait...