esakal | हसन मुश्रीफांवर कारवाई नक्की होणार - किरीट सोमय्या
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif

'उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना समजलं पाहिजे की तुमचे लोक घोटाळे करतात म्हणून सोमय्याला बोलता येतं ना. घोटाळे करणं बंद करा', असाही सल्ला सोमय्यांनी दिला आहे.

हसन मुश्रीफांवर कारवाई नक्की होणार - किरीट सोमय्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सोमय्यांनी माफी न मागितल्यास अनिल परब १०० कोटींचा दावा करणार असल्याचं म्हणाले होते. त्याला उत्तर देताना सोमय्या म्हणाले की, मी कोणत्याच नोटिशीला घाबरत नाही, मी ईडीकडे कागदपत्रे दिली आहेत. त्यांनी पुरावे मजबूत असल्याचं मला सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. यात आपल्याकडे २७०० पानांचा पुरावा असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं होतं.

मुश्रीफांवर कारवाई होणार का? त्यांना अटक होणार का असे विचारले असता सोमय्या म्हणाले की,'साखर कारखान्यात ९३ टक्के बेनामी गुंतवणूक आहे आणि याप्रकरणी निश्चितच कारवाई होईल.' हसन मुश्रीफांवर केलेल्या आऱोपानंतर सोमय्या सध्या दिल्लीत असून ते केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.

अनिल परब यांना किरीट सोमय्यांनी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसंच राज्यात अलिबाबा चाळीस चोरांचे सरकार असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले. एका पाठोपाठ एक घोटाळे बाहेर येतायत. नारायण राणेंचे बंगले अनधिकृत आहेत असं म्हणतायत पण त्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी असे सोमय्या म्हणाले.

हेही वाचा: दिल्ली पोलिसांची महाराष्ट्रात कारवाई; राज्याच्या गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद

'किरीट सोमय्यांच्या मुलाला बोलावलं, तुम्ही किरीट सोमय्यांना नोटिशी पाठवल्या पण आम्ही कधीच आयुष्यात भ्रष्टाचार केला नाही आणि मी ठाकरेंना घाबरत नाही', असे सोमय्यांनी ठणकावून सांगितले. तसंच रोहित पवारांनी कौतुक केलं त्याबद्दल सोमय्यांनी आभार मानले. रोहित पवारांनी ईडीचे प्रवक्ते असल्याचं म्हटलं होतं. 'उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना समजलं पाहिजे की तुमचे लोक घोटाळे करतात म्हणून सोमय्याला बोलता येतं ना. घोटाळे करणं बंद करा', असाही सल्ला सोमय्यांनी दिला आहे.

loading image
go to top