esakal | दिल्ली पोलिसांची महाराष्ट्रात कारवाई; राज्याच्या गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद
sakal

बोलून बातमी शोधा

dilip valse patil

घातपाताच्या संशयावरून 6 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

दिल्ली पोलिसांची महाराष्ट्रात कारवाई; राज्याच्या गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

घातपाताच्या संशयावरून काही व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. अटक केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांच्याकडून माहिती घेतली असून संपूर्ण माहिती समोर यायची आहे. ही संवेदनशील माहिती आहे. हा राजकारणाचा विषय नाही असेही ते म्हणाले.

तसंच एटीएसला या कारवाईची माहिती होती का? असे विचारले असता त्यांनी सांगितलं की, याची माहिती एटीएस प्रमुख विनित अग्रवाल तीन वाजता माहिती देतील. संपूर्ण घटनेबाबत मला काही सांगता येणार नाही. संवेदनशील घटना असून पोलिस तपास करतील आणि त्यातून सत्य समोर येईल असेही वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा: देश हादरवण्याच्या कटात जान महंमदचा सहभाग, राकेश अस्थाना मुंबईत

बाहेरच्या राज्यात जाऊन कारवाई करताना माहिती योग्य असेल आणि स्थानिक स्तरावर कोणाला ताब्यात घ्यायचं असेल तर त्यासंदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात येते. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याआधी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यायला हवी असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दहशतवाद्यांना अटक केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, ही खूप गंभीर गोष्ट आहे. देशात , मुंबईसारख्या ठिकाणी दहशतवादी पकडले जातात. आता दहशतवाद्यांना शोधणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना संपवलं पाहिजे असंही फडणवीस म्हणाले.

loading image
go to top