
किरीट सोमय्या पुन्हा राणांच्या भेटीला, दिल्लीत रंगली खलबतं
राजद्रोहाच्या खटल्यात जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी दिल्लीचा रस्ता धरला. महाराष्ट्रात राज्य सरकारने अन्याय केला असून लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याने उद्धव ठाकरेंविरोधात त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली. (Kirit Somaiya Meets Navneet Rana in Delhi)
दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देखील आता राणा दाम्पत्यांची भेट घेत आहेत. ते राणा यांच्या सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत सोमय्यांनी राणांची पुन्हा भेट घेतली. त्यामुळे आता महाविकास आघाडीविरोधात दिल्लीत खलबतं रंगल्याचं चित्र आहे. (Kirit Somaiya News)
हेही वाचा: नवनीत राणा दिल्लीकडे रवाना, भाजपच्या नेत्यांसोबत फिल्डिंग?
राणा दाम्पत्याने दिल्लीत जाऊन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. (Navneet Rana News) केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही रवी राणांनी म्हटलं आहे. राणांच्या दिल्लीत भाजपच्या नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचारा प्रकरणी सुरू असलेल्या केसेसवर आम्ही केंद्रीय यंत्रणांकडून माहिती घेणार आहोत. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार असून त्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी करणार असल्याचं राणांनी सांगितलं.
याआधी सोमय्यांनी राणांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी सोमय्यांवर हल्ला झाला होता. यानंतर राणांना लिलावतीत दाखळ केल्यानंतर सोमय्या आणि भाजपच्या चित्रा वाघ त्यांच्या भेटीला गेले होते. आता राणा दिल्लीतून सूत्र हालवत असताना सोमय्या पुन्हा त्यांच्या भेटीला गेले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने लोकसभेत पोहोचलेल्या राणांच्या पाठिशी भाजप उभा असल्याचं स्पष्ट झालंय.
Web Title: Kirit Somaiya Meets Navneet Rana In Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..