आणखी एका बंडखोर खासदाराचे तिकीट भाजप कापणार

Kirti Azad targets BJP leadership over ignorance
Kirti Azad targets BJP leadership over ignorance

पाटणा : बिहारी राजकारणातील 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा यांच्यापाठोपाठ भाजपमधून निलंबित करण्यात आलेले बंडखोर नेते खासदार कीर्ती आझाद यांनी पुन्हा भाजपविरोधात आगपाखड केली आहे.

काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका केल्याने आझाद यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता प्रदेश भाजपने आगामी निवडणुकीसाठी शत्रुघ्न सिन्हा आणि आझाद या दोघांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यावर अक्षरश: तुटून पडले आहेत. 

आज येथे पत्रकारांशी बोलताना आझाद म्हणाले, ''आपण दरभंगा येथूनच निवडणूक लढणार आहोत, अनेक पक्षांनी आपल्याला ऑफर देऊ केली असून, खरमास संपल्यानंतर निर्णय घेतला जाईल. दरभंगा हे सासर असून, येथे मला कोठेही मोफत खायला मिळते, अशा स्थितीमध्ये ही हक्काची जागा सोडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.''

दरम्यान, सतरा किंवा अठरा जानेवारी रोजी कीर्ती आझाद भावी राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. 

...म्हणून नाराजी 
दोन दिवसांपूर्वी दरभंगा येथील विमानतळाचा शिलान्यास समारंभ केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत पार पडला होता. या समारंभात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने आझाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे परस्परांच्या कामांमध्ये हस्तक्षेप करीत असतात, सार्वजनिक व्यासपीठावर स्थानिक लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अवमान केला जातो, असे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com