Kishtwar cloud burst during Machail Mata Temple yatra kills 60, over 200 missing : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे गुरुवारी अचानक ढगफुटी घटना घडली होती. या घटनेतील मृतकांची संख्या आणखी वाढली आहे. आतापर्यंत ६० आपले प्राण गमावले असून १०० हून अधिक नागरिक जखमी झाली आहेत. तसेच २०० हून अधिक नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. या नागरिकांना शोध घेतला जातो आहे. एनडीआरएफकडून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. तर जे जखमी आहेत त्यांच्यावर किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.