
गुरुवारी दुपारी १२.३० वाजता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे अचानक ढगफुटी झाली. माचैल माता मंदिराच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर ही आपत्ती आली. ज्यामध्ये दोन सीआयएसएफ जवानांसह ३८ जणांचा मृत्यू झाला. २०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या घटनेनंतर अचानक पूर आला आणि मोठ्या प्रमाणात विनाश झाला. १०० लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.