जम्मू-काश्मीर : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन अखल दरम्यान लष्कराला नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर, किश्तवार जिल्ह्यातील दुल भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा दलांनी (Army Operation) तातडीने मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असून, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.