स्वच्छ कॅम्पसमध्ये बेळगावची केएलई देशात तिसरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

बेळगाव - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वच्छ कॅम्पस मानांकनात विद्यापीठ गटात केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे. त्यामुळे केएलई संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

बेळगाव - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वच्छ कॅम्पस मानांकनात विद्यापीठ गटात केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे. त्यामुळे केएलई संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते केएलई संस्थेचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांनी हा मानांकन पुरस्कार स्वीकारला.

स्वच्छ कॅम्पसमध्ये केएलईने २०१७ मध्ये देशात चौथा क्रमांक मिळवला होता. यावर्षी संस्थेने आगाडी घेत तिसरे मानांकन मिळवले आहे. विविध निकषांवर स्वच्छ कॅम्पसचे मानकरी निवडण्यात येतात. त्यात शौचालयांची पुरेशी संख्या आणि देखभाल, कचऱ्याच्या निर्मूलनाची व्यवस्था, हॉस्टेलच्या कीचनमधील स्वच्छता आणि उपकरणे, पाण्याची शुद्धता, पुरवठा आणि साठवणूक, कॅम्पसमधील हिरवाई, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरउर्जेचा वापर आणि स्वच्छतेसाठी गाव दत्तक घेणे या निकषांचा समावेश आहे.

उच्च शिक्षण संस्थांच्या स्वच्छता मानांकनासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या तीन मूल्यमापकांनी २० सप्टेबर २०१८ रोजी केएलई कॅम्पसला भेट देऊन मूल्यमापन केले होते. त्यांनी दिलेल्या अहवालावरुन केएलईला हे मानांकनप्राप्त झाले आहे. केएलईचे कुलपती, कुलगुरुंनी हे मानांकन मिळवण्यासाठी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: KLE third in clean campus in country