esakal | CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक काय? सुशांतची केस CID कडे का दिली नाही? जाणून घ्या  
sakal

बोलून बातमी शोधा

Know difference between CID CBI NIA and IB

CBI हा विभाग नेमका आहे तरी काय? या विभागाचे काम कोणते? सुशांत सिंग राजपूतची केस इतर कोणत्या विभागाकडे न सोपवता CBI कडेच का सोपवण्यात आली? CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक कोणता? या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक काय? सुशांतची केस CID कडे का दिली नाही? जाणून घ्या  

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर: गेल्या ४ महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे देशातील राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे नक्की या प्रकरणाचा छडा लागणार कधी? या प्रकरणातील आरोपी कोण? यासाठी लोकं CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभाग या संस्थेकडून प्रचंड आस लावून बसले आहेत. 

मात्र CBI हा विभाग नेमका आहे तरी काय? या विभागाचे काम कोणते? सुशांत सिंग राजपूतची केस इतर कोणत्या विभागाकडे न सोपवता CBI कडेच का सोपवण्यात आली? CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक कोणता? या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

हेही वाचा - जन्मठेप म्हणजे किती वर्षांची शिक्षा? आजीवन कारावास की १४ वर्ष? वाचा सविस्तर

CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) - 

 • केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation (CBI) ही भारत सरकारची विशेष पोलिस आस्थापना आहे. 
 • गुन्हे अन्वेषण विभाग गुप्तहेर खाते आहे. CBI ची  स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी झाली. 
 • लाचलुचपत प्रतिबंध या विषयासंबंधी नेमलेल्या संथानम समितीने (1963) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती. 
 • ही विशेष पोलिस आस्थापना ते मुळात आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करतात 
 • पण राज्य किंवा उच्च न्यायालय / सुप्रीम कोर्टाने शिफारस केल्यास विशेष प्रकरणांमध्ये ते इतर प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करू शकतात.
 • म्हणूनच सुशांत सिंग राजपूतची केस सुप्रीम कोर्टाने CBI ला दिली आहे. 

CID (गुन्हे अन्वेषण विभाग) - 

 • गुन्हे अन्वेषण विभाग CID ची स्थापना ब्रिटिश सरकारने 1902 मध्ये केली होती.
 • CID चे प्राथमिक काम गंभीर गुन्हे, दंगली, खोटेपणा इत्यादींचा तपास करते. 
 • हे राज्य पोलिसांना मौल्यवान बुद्धिमत्ता उपलब्ध करून देतात.
 • CID हा विभाग राज्य विभागावर कार्यरत असतो. 

NIA (राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी) -

 • राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी एजन्सी 31 डिसेंबर 2008 रोजी अस्तित्वात आली.
 • हे केंद्रीय काउंटर टेररिझम लॉ एन्फोर्समेंट एजन्सी म्हणून काम करते.
 • NIA दहशतवाद संबंधी गुन्ह्यांचा छडा लावते आणि त्यासाठी काम करते. 

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

IB (इंटॅलिजन्स ब्युरो) -  

 • 1885 मध्ये जगातील सर्वात जुनी गुप्तहेर संस्था अस्तित्त्वात आली. 
 • 1947 मध्ये हे केंद्रीय बुद्धिमत्ता ब्युरो म्हणून पुन्हा सुरू करण्यात आले. 
 • दहशतवाद, गुन्हेगारी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविषयीची पार्श्वभूमी माहिती ही संस्था देते.
 • भारतीय गुप्तहेर विभागही कार्यरत ठेवते.  
 • मुत्सद्दी शपथ घेण्यापूर्वी ते सर्व प्रकारच्या गुप्तचर माहितीचा मुख्य स्त्रोत आहेत.