International Girl Child Day 2019 : जाणून घ्या या दिवसाविषयी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Girl Child Day 2019 : जाणून घ्या या दिवसाविषयी!

आजच्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला जगभरातून बालिका दिवस साजरा केला जात आहे.

International Girl Child Day 2019 : जाणून घ्या या दिवसाविषयी!

पुणे : आजच्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला जगभरातून बालिका दिवस साजरा केला जात आहे. मुलींसाठी अतिशय खास दिवस असून, ज्यांना मुलगी आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा मुलींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो.

सर्व मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सन्मानपूर्ण जीवन मिळण्यासाठी आणि हा दिवस साजरा करण्याची जबाबदारी युनेस्को (UNESCO) वर असते. 'Girl force : Unscripted and Unstoppable' ही यायावर्षीची आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाची थीम आहे. हा दिवस 2012 मध्ये साजरा करण्यास सुरवात झाली. मुलींना समाजात समान अधिकार मिळणे, तसेच स्त्रियांनी त्यांचे कौशल्य सर्वांपुढे आणणे व त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशांनी दिवस साजरा केला जातो. 

Vidhan Sabha 2019 : थोरात म्हणतात, ‘भाजप मजेशीर पक्ष; नेते सोडून पीएला उमेदवारी’

भारतामध्ये मुलींना प्रोत्साहन देणारे आणि त्यांना सर्वच स्तरावर संधी उपलब्ध करुन देणारे अनेक पुढाकार घेतले गेले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'ची योजना आणली.